अहमदनगर: मोबाईल हॅक करून पैसे उकळण्याचा प्रकार
Breaking News | Ahmednagar: अंगणवाडी सेविकांचे मोबाईल हॅक करून पैसे उकळण्याचा प्रकार.
श्रीरामपूर : अंगणवाडी सेविकांचे मोबाईल हॅक करून पैसे उकळण्याचा प्रकार नुकताच समोर घडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फेक कॉलद्वारे गळनिंब गावामध्ये १० ते १२ महिलांना फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील फसवणूकीची घटना ताजी असताना गळनिंब येथे एका महिलेला अंगणवाडी सोविका मदतनीसाचे नाव सांगून तुमच्या बाळाचे ७ हजार रुपये मंजूर झाल्याने फोन-पे सुरू करण्यास सांगितले. तसेच नोटिफिकेशन पाठवून तुमचे पैसे तुमच्या अकांउटला घेता येईल, अशी चलाखी
करून पाच हजार रुपये फोन पे द्वारे काढून घेतल्याचा प्रकार काल सोमवारी (दि.८) घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हॅकरने अन्य महिलांच्या कुटूंबातील गोपनीय माहिती चोरी केल्याचा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वीच बेलापूर खुर्द येथे एका अंगणवाडी सेविकेचा मोबाईल हॅक करून गावातील महिलांची माहिती घेवून त्यांना फेक कॉल करण्यात आले. तुमचे अनुदान मंजूर झाल्याचे सांगून पैसे पाठवण्यासाठी फोन-पे सुरू करा, अशी माहिती भरून ओटीपी मला टाका, अशी मागणी करून गावातील ५ ते ६ महिला या अमिषाला बळी पडून त्याच्या अकाउंटमधून पैसे चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे.
Web Title: Extorting money by hacking mobile phones
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study