Home अहिल्यानगर अहमदनगर: विहिरीच्या खोदकाम जिलेटीनचा स्फोट होऊन तिघे ठार

अहमदनगर: विहिरीच्या खोदकाम जिलेटीनचा स्फोट होऊन तिघे ठार

Breaking News | Ahmednagar: जिलेटीनचा स्फोट होऊन तिघे ठार झाल्याची घटना.

Exploding well drilling gelatin kills three

श्रीगोंदा :  विहीर खोदईचे काम सुरू असताना शनिवारी (दि.१५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास जिलेटीनचा स्फोट होऊन तिघे ठार झाले, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे बसस्थानकानजीक टाकळी कडेवळीत येथे घडली आहे. गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

गणेश नामदेव वाळूज (वय ३६), सूरज युसूफ इनामदार (वय २५, दोघे रा. टाकळी कडेवळीत), नागनाथ भालचंद्र गावडे (रा. बारडगाव सुद्रीक, ता. कर्जत), अशी तिघा मृतांची नावे आहेत.

टाकळी कडेवळीत येथेबसस्थानकापासून काही अंतरावर शेडगाव रस्त्यावर वामन गेणा रणसिंग यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते. काम करत असताना जिलेटीनचा स्फोट घडविण्यासाठी जॅकंबरच्या साहाय्याने खोलवर छिद्रे घेण्यात आली. त्या छिद्रांमध्ये जिलेटीनच्या नळकांड्या भरण्यात आल्या. दरम्यान, साचलेले पाणी काढण्यासाठी कृषिपंप विहिरीमध्ये टाकला. कृषिपंप सुरू केल्यानंतर जिलेटीनचा स्फोट झाला.

यावेळी विहिरीत असलेले कामगार जबर सुलेमान इनामदार, सूरज युसूफ इनामदार, गणेश नामदेव वाळुंज (सर्व रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा) आणि नागनाथ भालचंद्र गावडे (रा. बारडगाव सुद्रीक, ता. कर्जत) हे चार जण स्फोटात गंभीर जखमी झाले.

विहिरीच्या जवळ असलेले वामन गेणा रणसिंग आणि रवींद्र गणपत खामकर (दोघेही रा. टाकळी कडेवळीत) हे किरकोळ जखमी झाले. गावाजवळच घटना घडल्यामुळे ग्रामस्थांनी तत्काळ सर्वच जखमींना उपचारासाठी श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, गणेश नामदेव वाळूज, सूरज युसूफ इनामदार, नागनाथ भालचंद्र गावडे या तिघांचा मृत्यू झाला. जखमींवर श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Exploding well drilling gelatin kills three

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here