Home अकोले होतेय मुदत संपलेले खाद्यपदार्थ, किराणा विक्री ! अकोले तालुक्यात खळबळ

होतेय मुदत संपलेले खाद्यपदार्थ, किराणा विक्री ! अकोले तालुक्यात खळबळ

Breaking News | Akole: मुदत संपलेला किराणा व खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे आरोग्य व नगरपंचायतच्या संयुक्त पथकाला आढळून आले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दुकानदारांना नोटिसा.

Expired food, grocery sales

अकोले : शहरात जुनी बाजार पेठ, जुना नगरखाना, गांधी चौक, अगस्ती दिंडी मार्गावर असलेल्या किराणा, बेकरी, हॉटेल दुकाने तपासताना मुदत संपलेला किराणा व खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे आरोग्य व नगरपंचायतच्या संयुक्त पथकाला आढळून आले. यामुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित दुकानदारांना नगरपंचायतने नोटिसा पाठविल्या आहेत.

अकोले शहरात व पालखी दिंडी पायी मार्गावर असलेल्या किराणा, हॉटेल, बेकरी या दुकानातील कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी, स्वच्छता तसेच दुकानातील खाद्यपदार्थ, किराणा मालाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अकोले पंचायत समिती आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाळादेवी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पुंडलिक गोडे आणि अकोले नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी किराणा व हॉटेल, बेकरीची अचानक तपासण्या केल्या असता बहुतेक दुकानात मुदत संपलेले तेल, बेसनपीठ, मसाले आणि खाद्यपदार्थाची मुदत (एक्सपायरी) संपल्याचे या पथकाला आढळून आले.

मुदत संपलेले खाद्यपदार्थ विक्री करत असल्याचे तसेच खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी मुदत संपलेला माल, वस्तू वापरत असल्याचे आणि एकल प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याचे नगरपंचायतीच्या निदर्शनास आले. व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता दिसून आली नाही. सार्वजनिक आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. मुदत संपलेला माल व वस्तू वापरू नये. कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल वा व्यवसाय ना हरकत दाखला रद्द करण्यात येईल.

Web Title: Expired food, grocery sales

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here