संगमनेर तालुक्यात हॉटेलवर सायंकाळी छापा अन प्रकरण आले उघडकीस
Breaking News | Sangamner Crime: अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या हॉटेलवर आश्वी पोलिसांनी छापा (Raid) टाकून ६ हजार ६१० रुपयांची देशी- विदेशी दारु जप्त.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या हॉटेलवर आश्वी पोलिसांनी छापा टाकून ६ हजार ६१० रुपयांची देशी- विदेशी दारु जप्त केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्वी पोलीस ठाण्यात नव्याने हजर झालेल्या पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की, आश्वी बुद्रुक येथील इरिगेशन बंगल्याजवळील हॉटेल जय मल्हार येथे अवैध दारू विक्री चालू आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने श्री. सोनवणे यांनी रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता ६ हजार ६१० रुपये किंमतीचे देशी- विदेशी मद्य विक्री करताना सोमनाथ बबन गायकवाड (रा. प्रतापपूर, ता. संगमनेर) यास ताब्यात घेतले आहे.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
याबाबत हवालदार आनंद रतन वाघ यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमनाथ गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २२/२०२४ मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल पी. डी. साठे करत आहे.
Web Title: evening raid on a hotel in Sangamner Taluka revealed the case
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study