Home महाराष्ट्र आजोबांच्या हातातून सुटले अन् बाळ नाल्यात पडले!  रेल्वेस्थानकाजवळची दुर्घटना

आजोबांच्या हातातून सुटले अन् बाळ नाल्यात पडले!  रेल्वेस्थानकाजवळची दुर्घटना

मातेची चार महिन्यांची मुलगी तिच्या आजोबांच्या हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना.

Escaped from the hands of the grandfather and the baby fell

डोंबिवली: मुसळधार पावसामुळे लोकल वाहतूक ठप्प झाल्याने ठाकुर्ली ते कल्याण रेल्वेस्थानकादरम्यान हजारो प्रवासी रेल्वेतून उतरून ट्रॅकवरून वाटचाल करीत असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्री पुलाजवळील नाल्यावरील रुळातून जात असताना भिवंडीत राहणाऱ्या योगिता शंकर रुमाल (वय २५) या मातेची चार महिन्यांची मुलगी तिच्या आजोबांच्या हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे तासभर उभी होती. त्यामुळे अनेक प्रवासी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात असताना ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. चार महिन्यांचे हे बाळ घेऊन तिचे आजोबा चालत होते व सोबत बाळाची आई होती. अचानक आजोबांच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटले आणि ते नाल्यात पाण्याच्या प्रवाहात पडले. प्रवाहाच्या जोरात ते बाळ वाहून गेले. या आघातामुळे बाळाची आई जिवाच्या आकांताने आपल्या बाळासाठी आक्रोश करीत होती. ते पाहून साऱ्यांचेच डोळे भरून आले.

Web Title: Escaped from the hands of the grandfather and the baby fell

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here