Home अहमदनगर अहमदनगर: विजेच्या धक्क्याने अभियंत्याचा मृत्यू, वडील जखमी

अहमदनगर: विजेच्या धक्क्याने अभियंत्याचा मृत्यू, वडील जखमी

Ahmednagar News:  पोल्ट्री व्यावसायीक युवकाचा विजेचा मुख्य वाहिनीला धक्का लागल्याने शॉक बसून (electric Shock) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Engineer killed by electric Shock, father injured

जामखेड: तालुक्यातील बाळगव्हाण येथील पोल्ट्री व्यावसायीक युवकाचा विजेचा मुख्य वाहिनीला धक्का लागल्याने शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याचे वडील गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.1) दुपारी घडली. शुभम गोकुळ दाताळ (24) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याचे वडिल गोकुळ दाताळ हे या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.१) दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान शुभम आणि त्यांचे वडील गोकुळ हे दोघे पोल्ट्री फार्मच्या शेडजवळ काम करीत होते. मात्र, शुभम यांच्या हातातील लोखंडी वीजवाहक तारांच्या मुख्य तारेला लागला. त्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसला असून ते खाली पडले. त्यांच्याजवळच उभे असलेले त्यांचे वडील यांना धक्का बसला अन् ते बाजूला फेकले गेले. यात शुभम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यामागे आई, वडील, आजी, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांचे वडील जखमी झाले आहेत.

शुभम दाताळ हे इलेक्ट्रिक इंजिनीअरची पदवी घेऊन नोकरी न करता, स्वतःचा पोल्ट्री उद्योग चांगल्या पद्धतीने चालवित होते. लोणी फाट्याजवळील त्यांच्या शेतात त्यांनी १४ हजार कोंबड्यांचे मोठे वातानुकूलित शेड उभे केले होते. आधुनिक तंत्रज्ञानाने कोंबड्यांना खाद्य वाटप, पाणी देणे, स्वच्छता ठेवून त्यांनी व्यवसायात मोठी प्रगती करण्यास सुरुवात केली होती. दुसऱ्या शेडच्या उभारणीचे काम हाती घेतले होते.

Web Title: Engineer killed by electric Shock, father injured

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here