Home नाशिक कुटुंबाचा अंत; बाप-लेकाचा मृतदेह आढळला

कुटुंबाचा अंत; बाप-लेकाचा मृतदेह आढळला

Breaking News | Nashik: एकाच कुटुंबातील या चौघांचा अवघ्या महिनाभरात अकाली मृत्यू झाला. घरात बाप आणि लेकाचा मृतदेह आढळून आला.

End of the Family The dead bodies of father and son were found

नाशिक: पाथर्डी फाट्यानजीक वासननगर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. आजारपणामुळे नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. मुलीच्या तेरावीचा विधी होत असताना आईची तब्बेत खालावली आणि तिचा देखील मृत्यू झाला होता. मे महिन्यात झालेल्या या दोघींच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप- लेकालाही पाच दिवसापूर्वी काळाने गाठले. घरात बाप आणि लेकाचा मृतदेह आढळून आला आहे. अवघ्या महिनाभरात पाथर्डी फाटा परिसरातील वासननगरातील हसतं खेळतं महाजन कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं.

तुषार अरुण महाजन (४०) आणि त्यांचा मुलगा कार्तिक (१३) यांचे सोमवारी (दि.१७) निधन झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार हे पत्नी स्वाती (३५), मुलगी हर्षदा (९) आणि मुलगा कार्तिक (१३) यांच्यासह अडीच वर्षापासून येथे वास्तव्यास होते. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोणे येथून नाशिक शहरात वास्तव्यास आले होते. मे महिन्यात तुषार यांची मुलगी हर्षदाला ताप येण्याचे निमित्त झाले. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि त्यातच दि.१८ मे रोजी तिचा मृत्यू झाला. मुलीच्या अकाली जाण्याने स्वाती यांना कमालीचा मानसिक धक्का बसला आणि त्यांना देखील अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच हर्षदाच्या तेराव्याच्या दुसऱ्या दिवशी दि.३१ मे या दिवशी स्वाती यांचे निधन झाले. पाच दिवसापूर्वी सोमवार, दि.१७ जूनला सकाळी आठ वाजता भाचा हर्षल याने तुषार यांचेशी संवाद साधून जेवायला घरीच या असे सांगून तो निघाला. दहाच्या सुमारास जेवणासाठी त्यांनी फोन केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दार ढकलले त्यावेळेस दोघे बाप-लेक बेशुद्धावस्थेत आढळून आले. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. महिन्याभरात संपूर्ण कुटुंबाने एक्झिट घेतल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने दोघांचेही व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

भावाच्या निधनानंतर स्वातीसह दोघा मुलांचा स्वीकार

२०२० ला तुषार यांच्या आजारी वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या धक्क्याने त्यांच्या आईचे देखील निधन झाले. दुर्दैवाने त्याच वर्षी त्यांचे मोठे बंधू नितीन यांचे निधन झाले. नितीन यांच्या पश्चात पत्नी स्वाती, मुलगी हर्षदा व मुलगा कार्तिक हे होते. दोघा मुलांना आणि वहिनीला आधार मिळावा म्हणून तुषार यांनी भावजई असलेल्या स्वाती यांच्याशी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. स्वातीसह दोघा मुलांचा स्वीकार तुषार यांनी केला. अडीच वर्षांपासून हे कुटुंब या नव्या जागेत आनंदाने राहत होते. मात्र या चारही जणांचा महिनाभरात मृत्यू झाला.

Web Title: End of the Family The dead bodies of father and son were found

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here