Home क्राईम विवाहबाह्य संबंधाचा भयंकर शेवट: तरुणाकडून प्रेयसीला जाळण्याचा प्रयत्न करत स्वत:लाही संपवलं

विवाहबाह्य संबंधाचा भयंकर शेवट: तरुणाकडून प्रेयसीला जाळण्याचा प्रयत्न करत स्वत:लाही संपवलं

Chandarapur Crime: प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या (suicide).

End of Extramarital Affair Young man ends up trying to burn his girlfriend and suicide himself

चंद्रपूर: विवाहबाह्य संबंधाचा धक्कादायक शेवट झाल्याची घटना जिल्ह्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने गळफास घेत जीवन संपवलं. ही घटना मूल शहरात घडली. प्रेयसीला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. बंडू निमगडे असं आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूल येथील बंडू उर्फ रामचंद्र निमगडे या विवाहित व्यक्तीचे शहरातीलच एका विवाहित महिलेशी संबंध होते. बंडू हा विवाहित होता. त्याला एक मुलगा आहे. शेजारी असलेल्या विवाहितेशी बऱ्याच वर्षांपासून त्याचे प्रेमसंबंध होते. त्यांचा प्रेमसंबधाची चर्चा अधूनमधून व्हायची. त्यामुळे पत्नीसोबत बंडूचे नेहमी खटके उडायचे. नेहमी त्या दोघांची भांडणं होत होती. यामुळे तो मानसिकरित्या अस्वस्थ झाला होता. अशातच त्याने सोमवारी प्रेयसीचं घर गाठलं. रागाच्या भरात त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतलं. तिला जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली. या प्रकारानंतर बंडू स्वत:च्या घरी पोहोचला त्याने आणि गळफास लावून आत्महत्या केली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळतात ते घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणात अत्यवस्थ झालेल्या प्रेयसीला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेचा अधिक तपास मूल पोलीस करत आहेत.

Web Title: End of Extramarital Affair Young man ends up trying to burn his girlfriend and suicide himself

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here