Home नाशिक आठव्या मजल्यावरून उडी घेत कर्मचाऱ्याची आत्महत्या

आठव्या मजल्यावरून उडी घेत कर्मचाऱ्याची आत्महत्या

Suicide News: एका नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना.

employee committed suicide by jumping from the eighth floor

नाशिक:  शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, , अतुल करंडे (२९) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो मुळचा सातारा येथील रहिवासी होता. त्याने सोमवार (दि.०२) रोजी रात्रीच्या सुमारास हॉटेलच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला हॉटेलमधील इतर सहकाऱ्यांनी तात्काळ पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात  दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. तसेच त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: employee committed suicide by jumping from the eighth floor

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here