संगमनेर: अडीच लाखांच्या फ्लॉवरचा अपहार, दोघांवर गुन्हा
Sangamner Crime News: २ लाख ४९ हजार ६८९ रुपये किमतीचा फ्लॉवर गाजीपूर मार्केट (दिल्ली) येथे न पोहोचविता परस्पर विक्री करून अपहार.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मनोली येथून टेम्पोत भरून पाठविलेला २ लाख ४९ हजार ६८९ रुपये किमतीचा फ्लॉवर गाजीपूर मार्केट (दिल्ली) येथे न पोहोचविता परस्पर विक्री करून अपहार करण्यात आला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील मनोली येथून दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता फ्लॉवर भाजीपाला टेम्पोत ( क्रमांक एचआर ७३ बी ७५४९ ) भरून गाजीपूर मार्केट (दिल्ली) येथे पाठविण्यात आला होता. मात्र फ्लॉवर गाजीपूर मार्केटला न पोहोचविता २ लाख ४९ हजार ६८९ रुपये किमतीच्या
फ्लॉवरची परस्पर विक्री करून अपहार करण्यात आला. याप्रकरणी अबू बकर अब्दुल इनामदार (वय ३१ वर्ष, रा. समनापूर ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अडीच लाख रुपयांच्या फ्लॉवरची परस्पर विक्री करून अपहार केल्याच्या आरोपावरून आरोपी अझरुद्दीन फकरू खान (रा. रूपडाका ता. हतीन जि. पलवल, हरियाणा) व हर्षद ( पूर्ण नाव माहित नाही, रा. चिला ता. तावडू जि. नुहु, हरियाणा ) या दोघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Embezzlement of two and a half lakhs of flowers, crime against two