Home संगमनेर संगमनेर तालुक्यात कारखान्यात १० लाख रुपयांची वीज चोरी, वीज मीटरमध्ये छेडछाड

संगमनेर तालुक्यात कारखान्यात १० लाख रुपयांची वीज चोरी, वीज मीटरमध्ये छेडछाड

Sangamner News:  वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून एकूण 82 हजार 969 विद्युत युनिटस म्हणजे एकूण 10 लाख 57 हजार 800 रुपयांची वीज चोरी,(Theft) गुन्हा दाखल (Crime Filed).

Electricity theft of Rs 10 lakh in a factory in Sangamner taluka raid

संगमनेर: वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड करून वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. महावितरणच्या नाशिक मंडळ अंतर्गत असलेल्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रीपवेल इंजिनीअरिंग वर्क्स या कारखान्यामध्ये प्लास्टिक दाने निर्मिती करणार्‍या कारखान्याच्या वीजजोडणीची महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाने तपासणी केली असता वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून एकूण 82 हजार 969 विद्युत युनिटस म्हणजे एकूण 10 लाख 57 हजार 800 रुपयांची वीज चोरी केल्याचे समोर आले आहे.  

महावितरणने दिलेल्या फिर्यादीवरून सदर कारखाना चालविणारे राहुल सोनावणे यांचे विरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रीपवेल इंजिनीअरिंग वर्क्स  या कारखान्यामध्ये प्लास्टिक दाने निर्मिती करणार्‍या कारखान्याच्या नावाने थ्री फेज वीजजोडणी दिलेली असून सदर कारखाना राहुल सोनावणे हे चालवीत आहेत. सदर ठिकाणी तपासणीसाठी महावितरणचे भरारी पथक गेले असता वीजमीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड करून फेरबदल केल्याचे तपासणीत आढळून आले.

अशा प्रकारे वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून या कारखान्यात विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस झाले असून एकूण 82 हजार 969 विद्युत युनिटची म्हणजे एकूण 10 लाख 57 हजार 800 रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे महावितरण नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार विजय पवार यांनी संगमनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सदर कारखाना चालविणारे राहुल सोनावणे यांचे विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार पवार, कनिष्ठ अभियंता डी. जी. पंडोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. एस. जाधव व यु. इ. बागडे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Electricity theft of Rs 10 lakh in a factory in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here