नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, ९२ नगरपालिकांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर
Election program of 92 municipalities announced: अखेर नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व चार नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
१८ ऑगस्टला मतदान होणार
19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार
निवडणूक प्रक्रिया २० जुलैपासून सुरु
22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.
छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर केली जाणार
4 ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.
यंदा अर्ज माघारी घेणे व प्रत्यक्ष मतदान यात 14 दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे.
या 92 नगरपालिकांच्या होणार निवडणूका
राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. या कार्यक्रमानुसार 20 जुलैपासून निवडणूकीची प्रक्रिया सुरु होणार असून 18 ऑगस्ट रोजी मतदान व 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.
या मध्ये समाविष्ट नगरपालिका पुढील प्रमाणे
अ वर्ग नगरपालिका- भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड व उस्मानाबाद
ब वर्ग नगरपालिका- मनमाड, सिन्नर, येवला, दोंडाईचा वरवाडे, शिरपूर वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव सुर्जी,
क वर्ग नगरपालिका- चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर, वरणगाव, धरणागाव, एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल, जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी, राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, म्हसवड, रहिमतपूर, वाई, आष्टा, तासगाव, पलूस, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव, गंगापूर, खुलताबाद, अंबड, भोकरदन, परतूर, गेवराई, किल्लेधारुर, भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर, औसा, निलंगा, दर्यापूर, देउळगावराजा,
Web Title: Election program of 92 municipalities announced