Home महाराष्ट्र रुग्णालयातून बाहेर येताच एकनाथ शिंदेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया

रुग्णालयातून बाहेर येताच एकनाथ शिंदेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया

Maharashtra Government Formation Update: मुख्यमंत्री शिंदे हे आपला ताफा घेऊन मुंबईतील वर्षा निवासस्थानी रवाना.

Eknath Shinde's reaction in two sentences after coming out of the hospital

Eknath Shinde Update:  प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले एकनाथ शिंदे आता रुग्णालयातून बाहेर पडले असून मुंबईतील वर्षा या निवासस्थानी रवाना झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर येत होती. सुरुवातीला त्यांनी दरे येथील त्यांच्या गावी विश्राम केला. त्यानंतर गेले दोन दिवस ते ठाण्यात मुक्कामी आहे. ज्युपिटर रुग्णालयात नियमित तपासणी करून झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि अवघ्या दोन वाक्यांतच त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.

यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “चेकअपसाठी आलो होतो आणि आता प्रकृती उत्तम आहे.” ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये कोणतीही चिंताजनक बाब नसल्याचे समोर आले. तपासणीनंतर रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे आपला ताफा घेऊन मुंबईतील वर्षा निवासस्थानी रवाना झाले. याठिकाणी ते बैठका घेणार की नाही, याबाबत मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: Eknath Shinde’s reaction in two sentences after coming out of the hospital

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here