Home महाराष्ट्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार, गृहऐवजी नगरविकास अन आणखी एक महत्वाचे खाते मिळणार

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार, गृहऐवजी नगरविकास अन आणखी एक महत्वाचे खाते मिळणार

Maharashtra CM Update: शिंदे उपमुख्यमंत्री असणार.

Eknath Shinde will take the post of Deputy Chief 

मुंबई : एकनाथ शिंदे हे महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची माहिती अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिली. भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी दि. ५ डिसेंबरला होत असताना शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याविषयी पाच दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती.

शिंदे उपमुख्यमंत्री होतील पण त्यांना गृहमंत्रिपद द्यायला हवा अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली होती. माजी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय शिरसाट यांनी जाहीरपणे तशी मागणी केली होती. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडेच राहावे, असा भाजपचा आग्रह आहे. तो मान्य करत शिंदे यांना नगरविकास आणि आणखी एक महत्त्वाचे (जसे एमएसआरडीसी) द्यावे, असा नवीन पर्याय समोर आला. त्यावर दोन्ही पक्ष राजी होतील असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असतील असे अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार आता ते आणि शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत.

तुम्ही मंत्रिमंडळात हवेच नेत्यांनी घातली गळ

शिंदे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे किंवा शिंदेंचे विश्वासू दादा भुसे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. शिंदेसेनेच्या ज्येष्ठ आमदाराने ‘लोकमत’ला सांगितले की, स्वतः एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असलेच पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे.

Web Title: Eknath Shinde will take the post of Deputy Chief 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here