Home महाराष्ट्र शिंदेंचंही ठरलं, संभाव्य मंत्रिमंडळात कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट? पाहा यादी

शिंदेंचंही ठरलं, संभाव्य मंत्रिमंडळात कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट? पाहा यादी

Eknath Shinde Shiv Sena Cabinet Minister List: मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची मागणी करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती. 

Eknath Shinde Shiv Sena Cabinet Minister List

मुंबई : विधानसभा निवडणूक निकाल लागून २० दिवस झाले तरी देखील मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही.  अखेर महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी, त्यानंतर बैठकांचे सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहे. रविवारी, 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची मागणी करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात महायुतीला स्पष्ट आणि प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर निकालाच्या जवळपास 13 दिवसांनी 5 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता उद्या रविवारी 15 डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिलेदारांची नावे निश्चित केली आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या यादीत अनेक जेष्ठ माजी मंत्र्यांना नारळ देण्यात आला आहे.

पहा शिवसेनेची संभाव्य मंत्र्यांची यादी…

>> मंत्रीपद नक्की असणारे आमदार

> उदय सामंत

> शंभूराज देसाई

> दादा भूसे

>> काटावर असलेले आमदार

> गुलाबराव पाटील

> तानाजी सावंत

>> या नवीन चेहऱ्यांना मंत्री पद मिळणार

> भरत गोगावले

> राजेश शिरसागर

> प्रताप सरनाईक

> अर्जुन खोतकर

> भावना गवळी

> मंगेश कुडाळकर

> प्रकाश आबिटकर

Web Title: Eknath Shinde Shiv Sena Cabinet Minister List

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here