Karjat: कर्जत तालुक्यात आठ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
कर्जत | Karjat: तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. कारागृहातील २८ कैद्यांना करोनाची लागण झालेली होती तेच पोलीस कर्मचारी बाधित झाले आहेत. कर्जत तालुक्यात काल एकूण ३१ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये कर्जत पोलीस ठाण्यातील ८ पोलीस कर्मचारी बाधित झाल्याचे माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी येथील उपकरागृहातील २८ कैदी करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. त्यांना तातडीने नगर येथे नेण्यात आले होते. त्यांना सोडविण्यासाठी बंदोबस्त देण्यासाठी कर्जत येथील सात तर राशीन येथील एक पोलीस कर्मचारी गेले होते. या आठ जणांची करोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Eight police corona infected in Karjat