अहमदनगर ब्रेकिंग: आयशर टेम्पो, ट्रक व पिकअपचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
Ahmednagar Accident News: आयशर टेम्पो, ट्रक व पिकअपचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात पिकअपमधील तिघांचा मृत्यू झाला.
अहमदनगर: आयशर टेम्पो, ट्रक व पिकअपचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात पिकअपमधील तिघांचा मृत्यू झाला आहे, काल (मंगळवार) रात्री ११ वाजेच्या सुमारास नगरजवळील निंबळक बायपास रोडवर ही घटना घडली.
बाबासाहेब नामदेव जठार (वय ४४), महेश बाबासाहेब खैरनाथ (वय ३०, दोघे रा. येवला, जि. नाशिक) व आणखी एक (नाव समजू शकले नाही) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे आठ ते १० जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निंबळक बायपास रोडचे काम सुरू असल्याने एका बाजूनेच वाहतूक सुरू असून दुसरी बाजू वाहतूकीसाठी बंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री या रोडवरून जाणाऱ्या पिकअपला आयशर टेम्पो व ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. पिकअपमधील व्यक्ती देवदर्शन करून घराकडे जात असताना हा अपघात झाला असावा अशी माहिती पोलिसांकडून समजली.
दरम्यान याप्रकरणी पोलीस अंमलदार बाबासाहेब काळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर टेम्पो व ट्रकवरील अज्ञात चालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web TItle: Eicher Tempo, truck and pick-up fatal accident, three dead
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App