धक्कादायक! उच्च शिक्षित आईनेच पोटच्या तीन महिन्याच्या मुलीची गळा चिरून हत्या, आईला अटक
Nashik Crime News: उच्चशिक्षित आईनेच तिची मुलगी हिची घरातील भाजी कापण्याच्या चाकूने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना, आईला अटक.
नाशिक: अवधी तीन महिन्यांची मुलगी तिच्या वडिलांसारखी दिसते. ती माझ्याशी हसत नाही, सारखीच आजी व वडिलांकडे राहते, त्यामुळे सासरच्यांकडून मारले जाणारे टोमणे पासून पोटच्याच मुलीविषयी द्वेषभावना निर्माण होऊन उच्चशिक्षित संशयित युक्ता भूषण रोकडे हिने तिची मुलगी ध्रुवांशी भूषण रोकडे हिची घरातील भाजी कापण्याच्या चाकूने हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी युक्ताला अटक केली आहे. दरम्यान, उच्चशिक्षित युक्ताने अशाप्रकारचे विकृत कृत्य करून मायलेकीच्या नात्याला काळीमा फासल्याने या प्रकरणात पोलिस मानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घेणार आहेत.
रसायनशास्त्रातील पदवीधर असलेल्या संशयित युक्ता रोकडे हिने तिची मुलगी ध्रुवांशी ही वडील आणि आजीकडे पाहून हसते, जास्त वेळ त्यांच्याकडेच राहते, याचा राग येऊन ध्रुवांशीचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. युक्ता भूषण रोकडे (२६, रा. फ्लॅट नं १, ध्रुवनगर गंगापूर शिवार, नाशिक) हिने तिची तीन महिन्यांची मुलगी ध्रुवांशी घरात खेळत असताना किचनमधील चाकूने तिचा सपासप गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तिने चाकूचे रक्त व्यवस्थित धुवून चाकू पुन्हा किचनमध्ये ठेवून देत बेशुद्ध झाल्याचा बनाव केला. मात्र, तिचे कुटुंबीय घरात आल्यानंतर त्यांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती लगेच उठल्याने तसेच तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला होता. त्यामुळे युक्तासह सर्वच नातलगांची चौकशी झाल्यानंतर हा प्रकार उघड झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
Web Title: educated mother Murder her three-month-old daughter by slitting her throat
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App