मंत्री अनिल परबांवर ईडीची धाड, छापेमारी; सोमय्या म्हणतात बॅग तयार ठेवा
मुंबई | Mumbai: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधीत मनी लॉन्ड्रींग प्रकरणी सात विविध ठिकाणी निवासस्थानी ईडीने आज (गुरुवार) सकाळी छापेमारी (Raid) सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी सीआरझेडचे उल्लंघन करत हे रिसॉर्ट बांधल्याचा दावा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केली होती. त्यानंतरच ईडीने ही कारवाई केल्याचे दिसत आहे.
मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी सकाळी ७ वाजल्यापासून ईडीची रेड सुरू आहे. अनिल परब यांच्या खासगी निवासस्थान, शासकीय निवासस्थानासह पुणे, दापोली आणि मुंबई अशी एकुण ७ ठिकाणी कारवाई सुरु आहे. जवळपास ४ अधिकाऱ्यांकडून ही कारवाई सुरू आहे.
अनिल परबांवर ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना डिवचलं आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनी कपड्यांची बॅग भरून ठेवावी असा इशारा त्यांनी अनिल परब यांना दिला आहे.
Web Title: ED raids and raid Minister Anil Parab