राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या बड्या नेत्यावर ईडी ची कारवाई, संपती जप्त
Prafull Patel News: जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची मोठी कारवाई.
मुंबई: राष्ट्रवादीच्या देशमुख, मलिक यांच्यानंतर ईडीने राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी एक दणका दिला आहे. राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने पटेल यांचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं आहे. पटेल यांच्या इमारतीतील 2 मजले जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नेमकी जाणून घ्या काय आहे प्रकरण?
मुंबईतील वरळी इथे प्रफुल्ल पटेल यांची सीजे हाऊस नावाची मोठी इमारत आहे. इमारतीच्या बांधकामाआधी त्याजागी छोटी इमारत होती. ती इमारत इक्बाल मिर्चीच्या ताब्यात असल्याचा आरोप आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडून या इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली.
या पुनर्बांधणीच्या मोबदल्यात पटेल यांनी मिर्चीला रक्कम आणि जागा दिली असल्याचं इडीने सांगितलंय. याप्रकारात व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे ईडीने आज तपास सुरु केला आहे. ईडीने पटेल यांच्या विरुद्ध २०१९ मध्ये मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Web Title: ED big action against senior leader Prafull Patel