आवर घालणे आवश्यक, राधाकृष्ण विखे-पाटील
Breaking News | Ahilyanagar: अति उत्साही कार्यकर्त्याच्या उद्योगामुळे पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांची अडचण होते. ही अडचण विचारात घेतली जात नाही. याबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खंत व्यक्त केली.
शिर्डी : अति उत्साही कार्यकर्त्याच्या उद्योगामुळे पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांची अडचण होते. ही अडचण विचारात घेतली जात नाही. याबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खंत व्यक्त केली. अशा कार्यकर्त्यांना पक्ष आणि नेत्यांनी आवर घातला पाहिजे, असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.
राज्यातील महायुतीत कार्यरत असताना काही पक्षांकडून होणाऱ्या चुका आणि कार्यकर्त्यांच्या बेशिस्त वर्तनावर जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना मंगळवारी माध्यमांनी सवाल केले. यावेळी ते म्हणाले, महायुतीला जनतेने दिलेला जनादेश महत्त्वाचा असून, त्याचा आदर राखला गेला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या कार्यकर्त्यांना आवश्यक आहे. आवर घालणे
खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत घडलेल्या घटनेबाबतही विखे पाटील यांनी चिंता व्यक्त केली. अशा घटनांचे कोणीही समर्थन करणार नाही.
कोकाटे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न ?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, याबाबत लगेच निष्कर्षावर पोहोचणे योग्य नाही. कोकाटे यांनी स्वतः यावर खुलासा केला आहे. विधिमंडळातील व्हिडीओ काढून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे का? असा सवाल त्यांनी केला.
Breaking News: necessary to restrain, Radhakrishna Vikhe-Patil