संगमनेर: दोन सावकारांच्या घरावर उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाचे छापे
Breaking News | Sangamner: व्याजापेक्षा चौपट पैशाची वसुली करूनही पैशासाठी तगादा लावणाऱ्या सावकाराच्या जाचाला कंटाळून पती-पत्र ीने जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी.
संगमनेर : व्याजापेक्षा चौपट पैशाची वसुली करूनही पैशासाठी तगादा लावणाऱ्या सावकाराच्या जाचाला कंटाळून पती-पत्र ीने जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितल्यानंतर येथील उपनिबंधक कार्यालयाने तालुक्यातील साकूर येथील दोन सावकारांच्या घरावर शुक्रवारी छापे टाकले. या छाप्यामध्ये उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे कागदपत्र जप्त केले आहेत.
संगमनेर तालुक्यातील साकुर येथील विलास दौलत वाकचौरे व संगीता विलास वाकचौरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून आपली कैफियत मांडली होती. त्यांनी संगमनेर येथील उपनिबंधक कार्यालयाकडे दि.२९ जानेवारी रोजी तक्रार अर्ज केलेला होता. यानंतर उपनिबंधक कार्यालयाने कारवाई सुरू केली. या कार्यालयाने वाकचौरे यांना सुनावणीची तारीख देऊन प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. सुनावणीच्या दरम्यान त्यांनी या कार्यालयाकडे प्रतिज्ञापत्र व कागदपत्र सादर केल्यानंतर, या सर्व बाबींची खात्री करण्यात आली.
यानंतर ७ फेब्रुवारी रोजी कारवाईचे नियोजन करण्यात आले. साकुर येथील दोन सावकारांच्या विरोधात कारवाई करण्याकरिता उपनिबंधक कार्यालयामार्फत दोन पथके नियुक्त करण्यात आली. या पथकांचे राजेंद्र वाघचौरे व अल्ताफ शेख हे प्रमुख होते. दि. १६ फेब्रुवारी रोजी या पथकांमार्फत या दोन सावकारांच्या विरोधात धाडीचे कारवाई करण्यात आली. छाप्यामध्ये सापडलेले कागदपत्र दस्तावेज जप्त करून उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे सादर केले. उपलब्ध झालेल्या सर्व कागदपत्रांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी संस्था उपनिबंधक संतोष कोरे यांनी दिली. या कारवाईमुळे खाजगी सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे.
Web Title: Team of Deputy Registrar’s office raided the house of two moneylenders
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study