ऊसाच्या शेतात आढळला महिलेचा नको त्या अवस्थेत मृतदेह
Breaking News | Satara Crime: अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर.
सातारा: जिल्ह्यात असलेल्या फलटण तालुक्यातील वीडणी गावामध्ये अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील विडणी येथे एका महिलेचं अर्धवट मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल (शुक्रवारी) सकाळी प्रदीप जाधव यांच्या शेतात हा मृतदेह आढळून आल्याने तात्काळ पोलिसांना माहिती कळवली.
प्रथमदर्शनी ही घटना अंधश्रद्धेतून झाली असल्याचा अंदाज आहे. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस महिलेच्या कमरेवरील भागाचा शोध घेत आहेत. तसेच प्रदीप जाधव यांच्या उसाची ऊस तोडणी सुरुवात झाली आहे.
मृतदेहाजवळ साडी, हळदीकुंकू, काळी बाहुली, सुरा आढळून आल्यानं हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तसेच आसपासच्या परिसरात मिसिंगच्या केसेस आहेत त्यांच्या नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी देखील पोलीस बोलवत आहेत. सातारा पोलिसांपुढे महिलेच्या कमरेवर चा भाग शोधणे तसेच महिलेची ओळख पटवणे आणि आरोपींना शोधण्याचे मोठ आव्हान आहे. याचा छडा पोलीस कशा पद्धतीने लावणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साधारण दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हा खून झाला असल्याचा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते. प्रदीप जाधव यांचं हे शेत गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे. लोकवस्ती पासून साधारण दीड किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे निर्मनुष्य अशा ठिकाणी हा खून झालेला आहे. महिलेच्या कमरेच्या खालचा भाग पोलिसांना सापडला आहे. परंतु कमरेच्या वरचा भागाचा पोलिस शोध घेत आहेत. प्रदीप जाधव या शेतकऱ्याच हे उसाचं शेत आहे. उसाची तोडणी सुरू असताना हा सर्व प्रकार समोर आला आहे. आता सातारा पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे. या अज्ञात महिलेचा शोध घेतला जात आहे. जितक्या मिसिंग केस आहेत त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर या महिलेची ओळख पटवणे देखील सुरू आहे, मात्र अद्याप याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. त्याचबरोबर आरोपीचा शोध घेणे देखील पोलिसांसमोर एक मोठा आव्हान आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Dead body of a woman was found in a sugarcane field
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News