12 तारखेला दसरा मेळावा आणि जरांगे याच दिवशी सरकारचे 12 वाजवणार
Maratha Reservation: 12 तारखेला जरांगे पाटील राज्य सरकारचे 12 वाजविणार अशी संतप्त प्रतिक्रिया सोलापुरातील सकल मराठा समाजाने दिली. (Manoj Jarange Patil)
सोलापूर: मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने मराठा समाजाचा दसरा मेळावा नारायणगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यावरून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. नारायण गडावर जय्यत तयारी सुरु आहे. लाखोंच्या संख्येने या दिवशी मराठा समाज उपस्थित राहणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यात उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समाजाला करण्यात आले आहे. सोलापूरमधील सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी बोलताना समस्त मराठा समाजाला संबोधित करत आव्हान केले आहे, जो मराठा घरात बसला तो मराठा कसला. कोणत्याही राजकीय दसरा मेळाव्याला जाऊ नका; समाजाच्या दसरा मेळाव्यात या, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी सकाळी जाहीर पत्रकार परिषद घेतली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून दोन लाख मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या दसऱ्या मेळाव्याला जाणार असल्याची माहिती दिली. वेगवेगळ्या तालुक्यातून नारायणगड येथील दसरा मेळाव्याला जाण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. राजकीय मेळाव्याला न जाता,मराठा समाजाच्या मेळाव्याला जाण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन पत्रकार परिषद मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.
राज्य सरकारने मराठा सामजाची 42 वर्षांची मागणी आजही प्रलंबित ठेवली आहे. आचारसंहिता लागण्या अगोदर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी जरांगे यांनी केली होती. पण सरकारने मराठा समाजाच्या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला एकवट करण्यासाठी 12 तारखेला दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 12 तारखेला जरांगे पाटील राज्य सरकारचे 12 वाजविणार अशी संतप्त प्रतिक्रिया सोलापुरातील सकल मराठा समाजाने दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. मराठा समाजाकडून विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केली जाण्याची शक्यता आहे. आता दसरा मेळाव्यात मनोज जरांगे काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Title: Dussehra gathering on 12th and Jarange will play 12 of Sarkar on the same day
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study