Home Accident News डम्परची धडक, तरुणीच्या डोक्यावरुन चाक गेलं, खळबळजनक घटना

डम्परची धडक, तरुणीच्या डोक्यावरुन चाक गेलं, खळबळजनक घटना

Breaking News | Pune Accident: या धडकेनंतर तरूणीच्या डोक्यावरून डम्परचे चाक गेल्याने तरूणीचा जागीच मृत्यू झाला.

dumper hit, the wheel went off the young woman's head

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना घडली आहे.  कायम गजबजलेल्या कोथरूड स्टँडजवळ भीषण अपघात झालाय. रस्ता क्रॉस करत असलेल्या एका तरूणीला डम्परने धडक दिली आहे. या धडकेनंतर तरूणीच्या डोक्यावरून डम्परचे चाक गेल्याने तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यावर तरूणीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता.

कर्वे रस्त्यावरील कोथरूड स्टॅन्ड समोर २३ वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. मिळालेली माहिती अशी की, अपघातात मृत्यू झालेली मुलगी मुळची अमरावती येथील आहे. कोथरूड स्टॅन्ड समोर सिग्नलवरून मुलगी पायी चालत असताना डिव्हायडर वरून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी डंपर डम्पर आल्याने ती चाकाखाली गेली. या घटनेत मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. मिक्सर चालकाने या घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: dumper hit, the wheel went off the young woman’s head

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here