Home नाशिक जमिनीच्या वादातून अंगावर डिझेल ओतून सख्ख्या भावाला जिवंत जाळले

जमिनीच्या वादातून अंगावर डिझेल ओतून सख्ख्या भावाला जिवंत जाळले

Breaking News | Nashik Murder Crime: वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वादातून सख्या भावासह त्यांच्या कुटुंबियांनी ८० वर्षीय वृध्दास डिझेल टाकून जिवंत जाळल्याची घटना.

Due to a land dispute, Sakhkhya Bhava was burnt alive

नाशिक: जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील थर्डी सारोळे येथे वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वादातून सख्या भावासह त्यांच्या कुटुंबियांनी ८० वर्षीय वृध्दास डिझेल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेत वृद्ध शेतकरी ९५ टक्के भाजल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, , कचेश्वर महादू नागरे (वय ८०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. थर्डी सारोळे येथील नागरे बंधूमध्ये वडीलोपार्जीत विहीरीवरून वाद आहे. वयोवृध्द कचेश्वर नागरे हे मंगळवारी (दि.९) आपल्या शेतातील घराजवळ (House) साफसफाई करीत असताना अचानक हातात डिझेलचे डबके घेऊन आलेल्या त्यांच्या धाकल्या भावासह भावजई व दोन पुतण्यांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले.

दरम्यान, यानंतर कचेश्वर नागरे यांचा मुलगा हनुमंत नागरे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या घटनेत ते ९५ टक्के भाजले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. तर आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कचेश्वर नागरे यांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Due to a land dispute, Sakhkhya Bhava was burnt alive

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here