अहमदनगर ब्रेकिंग! दोन ट्रकच्या धडकेत चालक ठार, २ जखमी
Breaking News | Ahmednagar: दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रकचालक ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना.
शेवगाव: दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रकचालक ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना शेवगाव-पैठण रस्त्यावर घोटण येथे घडली. जखमीवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेवगाव-पैठण रस्त्यावर सुरू असलेल्या जलजीवन योजनेच्या कामासाठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या जलवाहिनीचे पाईप अस लेला ट्रक (जेजे १२ बीडब्ल्यू ७८१२) घोटणनजीक हॉटेल सागरसमोर पाईप उतरवण्यासाठी रस्त्याकडेला उभा होता. रात्री शेवगावहून पैठणकडे जाणाऱ्या पोलादने भरलेल्या ट्रकची (एमएच ५० बीडब्ल्यू २९५९) त्यास धडक बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात घोटणनजीक गुरुवारी रात्री १च्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातात सिद्धलिंग अन्नपावा पुजारी (वय २४, रा. कुमशी, कलबुर्गा (कर्नाटक) हा ट्रकचालक जागीच ठार झाला. संगमेश पुजारी (वय २५) व अभिषेक पुजारी (वय २४) जखमी झाले आहेत. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झाला नाही.
Web Title: Driver killed, 2 injured in collision between two trucks
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News