डॉ. सुजय विखे संगमनेरातून लढणार यावर आ. थोरातांची प्रतिक्रिया
Breaking News | Sangamner Vidhansabha Election 2024: डॉ. सुजय विखे पाटील यांच्या ऐवजी त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच निवडणूक लढवावी.
संगमनेर: डॉ. सुजय विखे संगमनेरातून लढणार असे त्यांनी जाहीर केले आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर थोरात म्हणाले, ते येत असतील स्वागतच आहे. मीच नाही तर संगमनेर तालुक्यातील सगळी जनता त्यांचे स्वागत करायला तयार आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या ऐवजी त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. संगमनेर तालुक्यातील कोळेवाडी येथे आदिवासी मेळाव्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आ. थोरातांनी भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रतिक्रिया दिली. डॉ.सुजय यांच्याऐवजी त्यांचे पिताश्री विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीच येऊन थेट निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
See also: Learn English
याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठक झाल्या आहेत. विजयादशमीपर्यंत सर्व चर्चा पूर्ण होईल, असे थोरातांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडून स्वतंत्र लढणार, या चर्चेवरआ. थोरात म्हणाले, महाविकास आघाडी पक्की असून सत्तेवर येणार असल्याचा ठाम विश्वास आहे. या चर्चा कुठून येतात माहीत नाही.
Web Title: Dr. Sujay Vikhe will fight from Sangamner Thorat’s reaction
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study