आ. डॉ. किरण लहामटे यांचा इशारा! खासगी सावकारशाही आता माझ्या रडारवर
Akole: अकोले तालुक्यात खासगी सावकारशाही (Private lending) विरोधातील लढा आता माझ्या रडारवर, मानवंदना मुरलीधर मास्तर नवले अभिवादनाप्रसंगी आमदार किरण लहामटे यांचा इशारा.
अकोले: सावकाराकडून घेतलेले पैसे व्याजासह परत करता येईनात म्हणून काही तरुणांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागल्याची उदाहरणे ताजी आहेत. मुरलीधर मास्तर नवले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. याकरिता अकोले तालुक्यातून खासगी सावकारांच्या जाचातून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य इतर कोणाची यापुढे आत्महत्या होऊ नये सेवक माणून मी लक्ष घालणार असून यापुढील काळात तालुक्यातील खासगी सावकार हा मुख्य विषय माझ्या रडारवर असेल. क्रांतिकारक मुरलीधर मास्तर नवले यांना अभिवादन करतानाच तालुक्यातील खाजगी सावकारशाहीच्या विरोधात माझा लढा राहील, जे कोणी यात गुंतले असतील त्यांनी आताच सुधारणा करून घ्यावी, सापडल्यास हयगय होणार नाही, असा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला.
नक्लेवाडीतील क्रांतिकारक मुरलीधर मास्तर नवले यांच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ. लहामटे बोलत होते. व्यासपीठावर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मधुकर नवले, मातोश्री मंदाबाई मुरलीधर नवले, प्रा. एस. झेड. देशमुख, माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, अॅड वसंत मनकर, अॅड. गोपाळराव गुळवे, अशोक भांगरे, भाकपचे नेते कारभारी उगले, ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रणेते डी. के. गोर्डे, अगस्ती कारखान्याचे संचालक अशोक देशमुख, मीनानाथ पांडे, विक्रम नवले, मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, विकास शेटे, महेश नवले, भाजपचे नेते गिरजाजी जाधव, रमेश जगताप, अॅड. आनंद नवले, रवींद्र नवले, लक्ष्मण नवले, येल्हुबा नवले, सुरेश नवले, नवलेवाडीचे सरपंच प्रा. विकास नवले,
स्व. मुरलीधर मास्तर नवले सहकारी दूध संस्थचे अध्यक्ष संजय नवले, मनोज मोरे, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड आर. डी. चौधरी होते. प्रा. इंद्रभान कोल्हाळ यांनी शाहीर वामनदादा कर्डक यांच्या ‘सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठं आहे हो..!’ या गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन निवृत्त प्रा. विलास नवले यांनी केले.
Web Title: Dr. Kiran Lahamte’s warning! Private lending is now on my radar
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App