आ. डॉ. किरण लहामटे यांना मिळाला ए,बी, फोर्म, प्रचार धडाक्यात | Vidhansabha Election
Akole Vidhansabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा एबी फॉर्म आ. लहामटे यांनी स्विकारला.
अकोले : महायुतीकडून अकोले मतदार संघ राष्ट्रवादी काँगेसच्या वाट्याला आला असून या मतदार संघातून विद्यामान आमदार डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा एबी फॉर्म आ. लहामटे यांनी स्विकारला.
मागील पाच वर्ष अकोले मतदारसंघाच्या विकासासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले असून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. माझ्या कामावर विश्वास ठेऊन अजितदादांनी मला पुन्हा अकोल्याचा विकास करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे अशी प्रतिक्रीया आ. डॉ. लहामटे यांनी व्यक्त केली.
Web Title: Dr. Kiran Lahamte got A, B, form Vidhansabha Election
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study