Home संगमनेर डॉ. बी. जी. डेरे इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये संस्काराची शाळा आजी-आजोबा मेळावा

डॉ. बी. जी. डेरे इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये संस्काराची शाळा आजी-आजोबा मेळावा

Dr. B. G. Dere English Medium School, Junior college and Pri-Primary Galaxy, Sangamner: आजी आजोबांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Dr. B. G. Grandparents rejoice at Dere English Medium School

संगमनेर: संगमनेर येथील संगम सेवा भावी संचलित डॉ. बी. जी. डेरे इंग्लिश मेडियम स्कूल, जुनिअर कॉलेज व गॅलेक्षी प्री  स्कुल मध्ये आजी-आजोबा आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. वृषाली मुकुंद  नाईक यांची उपस्थिती होती. आजी आजोबांनी आपल्या नातवांवर कशा प्रकारे प्रेम करावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.  तर संचालिका अंकिता डेरे, कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी, प्राचार्या रेखा पवार, प्राथमिक विभाग उप प्राचार्या स्मिता गुंजाळ यांचीही उपस्थिती होती. यावेळी आजोबांनी आपापली मनोगते व्यक्त केली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. भानुदास डेरे, उपाध्यक्ष अॅड. श्रीराज डेरे, संचालिका अंकिता डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलमध्ये बालकांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यात आजी आजोबांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आजी आजोबा मोठ्या संखेने हजर होते. 

यावेळी प्रमुख पाहुण्या मा.वृषाली नाईक बोलताना म्हणाले की, आजी आजोबा म्हणून आपण मायेची ऊब जरूर द्यावी.पण मुलांना त्यांचे लाईफ जगू द्यावे. जिथे गरज असेल तिथे आपण त्यांच्यासाठी उभे राहिले पाहिजे. लहान मुलं हे आपल्याला काहीतरी सांगत असतात ते आपण चांगले श्रोते म्हणून ऐकून घेतले पाहिजे. त्यामुळे मुलं चांगल्या व वाईट गोष्टी आपल्यासोबत शेअर करायला शिकतात व पुढे जाऊन ते नैराश्यात जात नाहीत. आजी आजोबांनी मुलांना प्रेमाचा स्पर्श देऊन मिठी मारून जवळ घेतले तर ते आपल्यासाठी खुप मोठे औषध असते. मुलांसोबत आपण वेळ घालवला पाहिजे, काही छोटे छोटे खेळ खेळले पाहिजे, त्यांना प्रेम दिले पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

‘आजी-आजोबा तुम्ही वटवृक्षासारखे आहात. तुम्ही अनेक नाती-गोती विणलेली असून, नव्या-जुन्याला जोडणारा दुवा आहात. तुम्ही कुटुंबाचा पाया, आधार आणि आशीर्वाद आहात’, असे मत संचालिका अंकिता डेरे यांनी व्यक्त केले.

यावेळी स्कुलच्या वतीने आजी आजोबांचे स्वागत करण्यात आले. घरगुती चहापानाचा आस्वाद घेतला. यावेळी आजी-आजोबांनी आपले अनुभव कथन केले. आम्ही देवाला प्रार्थना केल्याशिवाय कधी झोपी गेलो नाही. प्रार्थना आमच्या वैवाहिक जीवनाचे बळ आहे, असे एका आजोबाने सांगितले. तर, आम्ही दोघेही नोकरी करीत होतो त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. मात्र, आमच्या नातवंडांना सगळा वेळ देऊन त्यांची हौसमौज पुरवत आहोत. त्यांना धार्मिक वळण लावून योग्य संस्कार करीत आहोत’, असे एका आजीने सांगितले.

Web Title: Grandparents rejoice at Dr. B. G. Dere English Medium School

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here