Home पुणे दुहेरी हत्याकांड! पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन….

दुहेरी हत्याकांड! पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन….

Breaking News | Pimpri chinchwad Crime Murder: विवाहित महिला आणि प्रियकराची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली. महिलेचा दुसऱ्या पतीने ही हत्या केल्याची माहिती समोर आली.

Double murder Wife found in an unwanted situation with her lover

पिंपरी चिंचवडलगतच्या देहू रोड परिसरात विवाहित महिला आणि प्रियकराची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली. महिलेचा दुसऱ्या पतीने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अटकेतील पती ज्ञानेश्वर साबळे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध  सुरु असतानाच पतीने पाहिले. यातून मध्यरात्री साबळेने पत्नी आणि तिच्या प्रियकराची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केली.

ज्ञानेश्वर साबळे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर होता. त्याच्या पत्नीचा प्रियकर मजुरीचे काम करायचा. साबळेच्या पत्नीचा आधी एक विवाह झाला होता, पहिल्या पतीकडून दोन मुलं ही झाली होती. मात्र त्या पतीच्या मृत्युनंतर तिने साबळेशी लग्न केलं होतं. मात्र कालांतराने तिचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. याची कल्पना साबळेला होतीच मात्र मध्यरात्री त्याला पुरावा सापडला. राहत्या घरापासून लगतच्या परिसरात हे दोघे आढळले. यानंतर संतापलेल्या ज्ञानेश्वर साबळेने या दोघांची हत्या केली. देहूरोड पोलिसांनी साबळेला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असून यामधून आता आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, हे बघावे लागेल.

Breaking News: Double murder Wife found in an unwanted situation with her lover

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here