Home अहमदनगर मराठा समाजास रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका – मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजास रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका – मराठा क्रांती मोर्चा

Breaking News | Ahmednagar: मराठा समाजाला टार्गेट केले जात आहे. (Maratha Reservation).

Don't force the Maratha community to take to the streets 

अहमदनगर: बीड, परळी आणि पाथर्डीत ओळख पाहून वाहने सोडली जात असून, मराठा समाजाला टार्गेट केले जात आहे. मराठा समाज संयमी आहे. मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका, असा इशारा अहमदनगर मराठा क्रांती मोर्चाचे गोरख दळवी यांनी येथे दिला.

मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची बुधवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी दळवी बोलत होते. पत्रकार परिषदेस अॅड. गजेंद्र दांगट, माजी नगरसेवक मदन आढाव आदी उपस्थित होते. बीड, परळी आणि पाथर्डी तालुक्यात वाहने तपासून सोडले जात आहेत. त्यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी; जेणेकरून दोन समाजात वाद निर्माण होणार नाहीत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शांत राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तशाच सूचना मुंढे यांनीही द्याव्यात. मराठा समाज संयमी आहे. मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका, असा इशारा दळवी यांनी दिला. अॅड. गजेंद्र दांगट म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केल्याने सरकार लक्ष्मण हाके यांच्या सारख्यांना आंदोलन करण्यासाठी ताकद देत आहे. त्यांचे आंदोलन मंत्रीपदासाठी आहे. सरकारने जातनिहाय जणगणना करून त्यानुसार आरक्षण सगेसोयऱ्याच्या द्यावे. सरकारने कायद्याची अंमलबजावणी करावी.

Web Title: Don’t force the Maratha community to take to the streets 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here