Home अहमदनगर अहमदनगर:  डॉक्टरचा मृतदेह ओढ्यानजीक काटवणात आढळल्याने खळबळ

अहमदनगर:  डॉक्टरचा मृतदेह ओढ्यानजीक काटवणात आढळल्याने खळबळ

Breaking News | Ahmednagar: डॉक्टरचा मृतदेह (Dead body) बेलापूर शिवारात ओढ्यानजीक काटवणात आढळल्याने खळबळ.

doctor's dead body was found in Katwana near the stream

श्रीरामपूर : राहुरी कारखाना येथील डॉ. भागवत आनंदा लहारे (५९) यांचा मृतदेह बेलापूर शिवारात ओढ्यानजीक काटवणात आढळल्याने खळबळ उडाली आहे. ‘बँकेत पैसे भरून येतो,’ असे सांगून दि.१० रोजी डॉ. लहारे घराबाहेर पडले होते. ते घरी आले नाही. घरच्यांकडून शोध सुरू होता. बेलापूर ओढ्याजवळ मोटारसायकल बेवारस उभी असल्याची माहिती  कळाल्याने बेलापूर पोलिसांनी ती पोलिस ठाण्यात आणून लावली.

दरम्यान, डॉ. लहारे त्यांचा पुतण्या पोलिस ठाण्यात आला असता त्याला गाडी दिसली. पोलिसांनी गाडी सापडलेल्या ठिकाणाचा शोध घेतला असता काटवणात डॉ. लहारे यांचा मृतदेह आढळला. तेथे विषाची, दारूची बाटली व ग्लास आढळला. विष प्राशन करून डॉ. लहारे यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांचा मुलगा परदेशी शिकत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: doctor’s dead body was found in Katwana near the stream

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here