Home पुणे 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीची आत्महत्या

10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Breaking News | Pune Suicide: मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार.

Doctor girl committed suicide after refusing to marry after taking 10 lakh rupees

पुणे : पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोपट बाबुराव फडतरे (वय ५८, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुलदिप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीत ७ जानेवारी रोजी घडली होती. पल्लवी पोपट फडतरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी कुलदिप सावंत याने लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे भासवुन नोंदणी केली. फिर्यादी यांना तो देहु येथे समक्ष जाऊन भेटला. फिर्यादी यांना त्याचे वागणे व आरोपीचा दवाखाना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी कुलदिपला नकार कळविला होता. असे असताना फिर्यादींच्या अपरोक्ष त्याने त्यांच्या मुलीशी पल्लवीशी संपर्क साधला. तिला लग्नाचे आमिष दाखविले. पल्लवी ही बीएमएसएच झाली असून तिचे तुळजाभवानी सोसायटीत क्लिनिक आहे. कुलदिप याने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिने लग्नाचा विषय काढल्यावर आपले लग्न झाले असून आपली पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला. तिने त्याच्याकडे १० लाख रुपये परत करण्याची मागणी केली. परंतु, तो टाळाटाळ करु लागला. तेव्हा तिने चिठ्ठी लिहून आपल्या क्लिनिकमध्ये विषारी औषध घेतले. ही बाब समजल्यावर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना ८ जानेवारी रोजी तिचा मृत्यु झाला.

याबाबत पोपट फडतरे यांनी सांगितले की, कुलदिप सावंत याने आपल्या मुलीची फसवणूक केली आहे. तिच्यापासून आपले लग्न झाल्याचे लपवून ठेवले. तिच्या मृत्युला कुलदिपच जबाबदार आहे. ती रुग्णालयात उपचार करत असताना तो तिला पहायला आला होता. आम्ही गडबडीत असल्याने त्यावेळी काही करु शकलो नाही. आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे. बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव तपास करीत आहेत.

Web Title: Doctor girl committed suicide after refusing to marry after taking 10 lakh rupees

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here