Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरासह विभाजनावरुन वाद पेटणार?

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरासह विभाजनावरुन वाद पेटणार?

Ahmednagar Rename News: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावरून वाद पेटण्याची शक्यता, नामांतराचा विषय आता जिल्हा विभाजनाकड वळला.

ispute be ignited by partition with rename of Ahmednagar district 

अहमदनगर : औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याच्या नामांतराचा तारांकित प्रश्न नागपूर अधिवेशनात उपस्थित केला होता. तर, (rename of Ahmednagar district) अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याच्या मागणीला भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी विरोध केला आहे.

महाविकास आघाडी सरकाराच्या काळात औरंगाबादचे नाव संभाजीनगरतर उस्मानाबादच नाव धाराशीवकरण्यावर शिक्कामोर्तब झालं. यानंतर आता अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी होऊ लागली आहे. अहमदनगर महानगरपालिकेत महासभेत ठराव करून शासनाला पत्र पाठवण्यात आले आहे.

पण, स्थानिक नेत्यांकडून या संदर्भात कसलीही मागणी नाही, शिवाय काही नेत्यांकडून अहमदनगरच्या नामांतरालाच विरोध आहे. त्यामुळे अहिल्यादेवी नगर या नामांतरासंदर्भात महानगरपालिका आणि स्थानिक नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

अहमदनगर जिल्हा नामांतराचा विषय आता जिल्हा विभाजनाकड वळला आहे. नामांतराची मागणी होण्याआधीपासूनच अहमदनगरच्या नामांतराचा वाद सुरु आहे.  नगर शहर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्ह्याच्या नामांतरापेक्षा जिल्हा विभाजन करणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शिर्डी येथे पोलीस उपाधीक्षक कार्यालय झालं त्याबरोबरच श्रीरामपूर येथे आरटीओ कार्यालय करण्यात आला आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात सुधारणा करायच्या असतील तर आधी जिल्ह्याचे विभाजन केलं पाहिजे आणि नंतर नामांतराचा विषय काढला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

तर, खासदार सुजय विखे यांनी जिल्हा विभाजनाला कडाडून विरोध केला आहे जिल्हा विभाजन केल्याने कुठलाही वेगळा फायदा मिळणार नसून जिल्ह्यातील उत्तर भागातील प्रभावामुळे नगर जिल्ह्याला वेगळं स्थान प्राप्त होत त्यामुळे जिल्हा विभाजनाला आपला कायम विरोध असेल असं म्हटलं आहे.

Web Title: dispute be ignited by partition with rename of Ahmednagar district

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here