Home अहमदनगर अहमदनगर: ड्युटीवर असताना नर्सबरोबर लज्जास्पद गैरवर्तन

अहमदनगर: ड्युटीवर असताना नर्सबरोबर लज्जास्पद गैरवर्तन

Breaking News | Ahmednagar: खासगी रुग्णालयात नाईट ड्युटीवर असताना वार्ड बॉयने एका स्टाफ नर्सचा विनयभंग केल्याची घटना.

Disgraceful misbehavior with nurse while on duty

अहमदनगर: नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात नाईट ड्युटीवर असताना वार्ड बॉयने एका स्टाफ नर्सचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री आठ ते शनिवारी (दि. ४) पहाटे पाचच्या दरम्यान घडली.

 या प्रकरणी पीडित नर्सने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान विजय पाडळे (रा. सिध्दार्थनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या वॉर्ड बॉयचे नाव आहे. फिर्यादी या रुग्णालयात शुक्रवारी रात्री आठ वाजता ड्यूटीसाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत इतर स्टाफ ड्युटीसाठी होता. दरम्यान पहाटे पाच वाजता भगवान पाडळे फिर्यादीजवळ आला व त्याने त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर भगवान तेथून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास अंमलदार गोरडे करत आहेत.

Web Title: Disgraceful misbehavior with nurse while on duty

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here