Home महाराष्ट्र रात्री उशिरापर्यंत शिंदे फडवणीस यांच्यामध्ये खलबत, काय चर्चा झाली वाचा

रात्री उशिरापर्यंत शिंदे फडवणीस यांच्यामध्ये खलबत, काय चर्चा झाली वाचा

Eknath Shinde:  मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशन यावर ही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

discussed between Eknath Shinde Fadwanis till late night

Latest Marathi News:  काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बैठकीत नक्की काय चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. अशावेळी या बैठकीत नक्की काय चर्चा झाली? याची माहीती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. यावेळेस संपर्ण मंत्रिमंडळाचा शपथ विधी होणार होता.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा काही काळासाठीच म्हणजेच काही तसांचा असल्यामुळे संपर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी त्यावेळी होऊ शकला नाही. अशावेळी येता काळात मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे

वर्षा निवासस्थानी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळजवळ एक तास चर्चा झाल्याचे वृत्त आहे मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशन यावर ही चर्चा झाली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये १० कॅबिनेट मंत्री पद तर तीन राज्यमंत्रीद दिली जाणार आहेत

येत्या 16 डिसेंबरला विधिमंडळाचं हिवाळी अधिनेशन होणार आहे. मात्र त्या आधी मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.

तसंच 11 डिसेंबरला हा शपथविधी होऊ शकतो, असं महायुतीतीलच काही नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Web Title: discussed between Eknath Shinde Fadwanis till late night

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here