निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पुन्हा विसर्ग वाढवला. पुलावरून वाहते पाणी, वाहतुकीस बंद
Breaking News | Akole Flood: प्रवरा नदीला पुर आलेला असुन नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला.
अकोले: निळवंडे धरणातून प्रवरा नदिपात्रात पुन्हा विसर्ग वाढवला…..निळवंडे धरणातून १३२०३ क्युसेकने पाणी प्रवरा नदिपात्रात सोडण्यात आले .
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसाने धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत असल्याने भंडारदरा — निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे भंडारदरा धरणातून सायंकाळी ५ वा ९७७४ क्युसेकने तर निळवंडे धरणातून १३,२०३ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असल्याने प्रवरा नदीला पुर आलेला असुन नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान अगस्ती पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे, तर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिला आहे.
Breaking News: Discharge from Nilwande Dam into Pravara river basin increased again