Home अहमदनगर अहमदनगर: डिजिटल बोर्डच्या दुकानाला आग लागून खाक, लाखोंचे साहित्य खाक

अहमदनगर: डिजिटल बोर्डच्या दुकानाला आग लागून खाक, लाखोंचे साहित्य खाक

Breaking News | Ahmednagar: कोहिनूर प्लाझा इमारतीतील डिजिटल बोर्डाच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून संपूर्ण दुकान खाक.

Digital board shop gutted by fire, materials worth lakhs destroyed

अहमदनगर : शहरातील नगर-मनमाड रोडवरील पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा इमारतीतील डिजिटल बोर्डाच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून संपूर्ण दुकान खाक झाले. शनिवारी (दि.२२) दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

सकाळी कर्मचाऱ्याने दुकान उघडून कामकाज सुरू केले होते. साडेअकरा वाजेच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूने शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भडका घेऊन संपूर्ण दुकानात आग पसरली. यावेळी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली तेव्हा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

अग्निशमन बबातन पाणी मारल्यानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान, कोहिनूर प्लाझा इमारतीत अनेक दुकाने आहेत. तातडीने आग विझविण्यात आल्याने ही आग इतरत्र पसरली नाही. या घटनेत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य खाक झाल्याचे दुकान मालकाने सांगितले

कोहिनूर कॉम्प्लेक्स इमारतीच्या खालच्या बाजूला व्यावसायिक दुकाने आहेत. तेथील श्रवण यंत्राच्या दुकानातून दुपारी 12 च्या सुमारास धूर येत असल्याने परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना व मनपा अग्निशामक दलाला कळवले. पोलिसांनी तातडीने तेथे येऊन बघ्यांची गर्दी हटवली व मनपाचे अग्निशामक दलही त्याचवेळी पोहोचले व त्यांनी पाण्याचा दुकानाच्या शटरवर मारा केला व नंतर महत्प्रयासाने ते उघडले. त्यातून धूर व ज्वाळांचा लोट बाहेर आला. त्यानंतर सुमारे तासभर पाण्याचा अखंड मारा करून आग आटोक्यात आणली गेली. या दुकानाशेजारीच बंदूक घर नावाचे दुकान आहे. तेथील बुलेटस व बंदुकींचा आगीच्या उष्णतेमुळे स्फोट होण्याची भीती असल्याने मनपा अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ व त्यांच्या सहकार्‍यांनी धाडसाने आत जाऊन तेथील सर्व साहित्य बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

Web Title: Digital board shop gutted by fire, materials worth lakhs destroyed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here