Home Accident News अहमदनगर: भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; दाम्पत्याचा मृत्यू

अहमदनगर: भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; दाम्पत्याचा मृत्यू

Breaking News | Accident: माहूर येथे रेणुकामातेच्या दर्शनाला जाताना – चालकाला डुलकी लागल्याने चारचाकी वाहन झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यात दाम्पत्याचा मृत्यू झाला.

Devotee's vehicle suffers fatal accident; Death of a couple

अहमदनगर / यवतमाळ : राहुरी (जि. अहमदनगर) येथून माहूर येथे रेणुकामातेच्या दर्शनाला जाताना – चालकाला डुलकी लागल्याने चारचाकी वाहन झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यात दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर आठजण वे गंभीर जखमी झाले. ही घट ना सोमवारी सकाळी साडेसहा वाजेदरम्यान पुसद ते वाशिम मार्गावरील सत्तरमाळ घाटात घडली. अपघातातील मृत व जखमी राहुरी येथील रहिवासी आहेत.

मनीषा बबन गुलदगड (५०), बबन किसन गुलदगड (५५, दोघेही रा. राहुरी, जि. अहमदनगर) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. तर चालक मुकुंद दत्तात्रय लांडे (४९), मयूर सुरेश रोकोळे (२५), सागर शाळाहारी सरोदे (२५), किरण भैरव बोरुडे (३०), सारिका गोरख बबन गुलदगड मनीषा गुलदगड सुडके (४०), मंदा बाबू गडकल (५०), सार्थक संतोष बोरुडे (१३), संतोष लक्ष्मण बोरुडे (४०, सर्व रा. राहुरी, जि. अहमदनगर) अशी जखमींची नावे आहेत. अहमदनगर येथून दहा भाविक वाहनाने (क्र. एमएच १६, एजे ६०१०) रेणुकादेवीच्या दर्शनासाठी माहूरला जात होते. सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान वाशिममार्गे पुसदकडे येत असताना सत्तरमाळ घाटात चालकाला डुलकी लागली. यामुळे भाविकांचे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या सागाच्या झाडावर आदळले. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चालकासह आठजण गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. जखमींना मदतीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. मृतांचे शवविच्छेदन पुसद येथे करण्यात आले. याप्रकरणी चालक मुकुंद लांडे (४९, रा. सुडकेमळा, जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अपघात झाल्यावर जवळपास दीड ते दोन तास अपघातग्रस्तांना मदत मिळाली नाही. यामुळे गंभीर जखमी घटनास्थळीच तडफडत होते. घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती खंडाळा ठाणेदार देवीदास पाटील यांना देण्यात आली. त्यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर सर्व जखमींना वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

राहुरी शहरातील भाविक रविवारी (दि. ६) रात्री माहूर येथे गेले होते. गुलदगड हे भाजीपाल्याचे व्यापारी होते. मृत आणि जखमींच्या घराला कुलूप होते. नातेवाईक पुसद आणि वाशिमला गेले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे राहुरी शहरावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Devotee’s vehicle suffers fatal accident; Death of a couple

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here