अहमदनगरमध्ये डेंगूने पाय पसरले, डेंग्यूचे १५ रुग्ण
Breaking News | Ahmednagar: सध्या डेंग्यूचे १५ रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर मनपा आरोग्य विभाग सतर्क झाले.
अहमदनगर : अहमदनगर शहरासह जिल्हाभरात डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अहमदनगर शहरात सध्या डेंग्यूचे १५ रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर मनपा आरोग्य विभाग सतर्क झाले असून प्रत्येक प्रभागात धूर फवारणी, स्वच्छता याकडे लक्ष दिले जात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. शिवाय वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे साथरोग पसरत आहे. दरम्यान डेंग्यूने देखील पाय पसरण्यास सुरवात केली असून आता अहमदनगरमध्ये देखील डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. सध्या अहमदनगर शहरात १५ डेंग्यूचे रुग्ण असून अनेक डेंग्यू सदृश्य आजाराने ग्रस्त आहेत. यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाली आहे.
मनपासोबतच काही सामाजिक संस्था देखील साथीचे आजार वाढू नये; यासाठी प्रयत्न करत आहेत. यात आमदार संग्राम जगताप यांच्या सामाजिक संस्थेचा पुढाकार पाहायला मिळत आहे. शहरात फवारणी आणि जनजागृतीचे काम सुरू आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनपा आरोग्य विभागाने अतिरिक्त ५० जणांचे मनुष्यबळ सोबत घेऊन परिसरात स्वच्छतेसह इतर उपाय योजना सुरू केल्या. तसेच आठवड्याच्या प्रत्येक रविवारी नागरिकांना सोबत घेऊन देखील स्वच्छता केली जात आहे. दरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा ताप आला असेल तर मनपाच्या सात आरोग्य केंद्रावर तातडीने जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन अहमदनगर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांनी केले आहे.
Web Title: Dengue spread in Ahmednagar, 15 dengue patients
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study