सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी
Breaking News | Jalgaon Crime: सेवापुस्तक भरण्यासाठी अधिकाऱ्याने राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी महिलेला शरीरसुखाची मागणी केली. हा धक्कादायक प्रकार वर्षभरापासून सुरू.
जळगाव: सेवापुस्तक भरण्यासाठी अधिकाऱ्याने राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी महिलेला शरीरसुखाची मागणी केली. हा धक्कादायक प्रकार वर्षभरापासून सुरू होता. याप्रकरणी वरिष्ठ लिपिक रामलाल निवृत्ती पवार (रा. वाघनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २००८ पासून एक महिला कार्यरत असून, त्याच ठिकाणी जुलै २०२४ पासून रामलाल पवार हा वरिष्ठ लिपिक आहे. सुरुवातीला त्याने महिलेच्या मोबाइलवर मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. कामाच्या ठिकाणीही अश्लील हावभाव करून द्विअर्थाने बोलायचा. महिलेने त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर सेवापुस्तिका भरण्यासाठी त्याने शरीरसुखाची मागणी केली. वेळोवेळी त्याने अश्लील इशारे करीत विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Breaking News: Demand for physical pleasure to fill out the service book