अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर बदनामी, संशियीत जेरबंद
Breaking News | Ahmednagar News: अल्पवयीन मुलीबरोबर काढलेले फोटो इंस्टाग्रामवर टाकून बदनामी करणाऱ्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले.
श्रीरामपूर: अल्पवयीन मुलीबरोबर काढलेले फोटो इंस्टाग्रामवर टाकून बदनामी करणाऱ्या तरुणास पोलिसांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास जेरबंद केले. यश हरिभाऊ चौधरी (वय २१), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
गेल्या आठ, नऊ महिन्यांपूर्वी राहाता तालुक्यातील जळगाव येथील चौधरी वस्तीवर राहणारा यश हरिभाऊ चौधरी (वय २१) याने अल्पवयीन मुलीबरोबर इंस्टाग्रामवर ओळख करून तिच्यासोबत मैत्री केली व शाळेत कॅम्पसमध्ये तिच्या सोबत फोटो काढले. ती शाळेतून येताना जाताना तिचा पाठलाग करून तू मला फार आवडतेस असे बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तसेच अल्पवयीन मुलीबरोबर काढलेले फोटो तिच्या नातेवाईकांना इंस्टाग्रामवर टाकून समाजात बदनामी होईल असे कृत्य केले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे यश हरिभाऊ चौधरी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ), ३५४ (ड), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो त्याच्या राहते घरी चौधरी वस्ती, जळगाव ता. राहाता, जि. अहमदनगर येथे असून तो सकाळी मुंबईला पळून जाणाच्या तयारीत आहे. अशी माहिती मिळताच तपास पथक हे मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या राहते घरी गेले असता सदर गुन्ह्यातील आरोपी मिळून आला. त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे करत आहेत.
Web Title: Defamation of minor girl on Instagram, suspect Arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study