तरुणीचे इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी
अहमदनगर | Ahmednagar: सोशियल मेडीयाचा (instagram) जगभरात चांगलाच प्रसार आहे. या माध्यमातून हजारो लोक एकमेकांना जोडले गेले आहे. मात्र काही जण याचा दुरुपयोग करीत असतात. एखाद्याचा दुश्मनीचा बदला घेण्यासाठी जवळची व्यक्तीच सोशल मीडियावरील फोटो, नावाचा गैरवापर करून बनावट अकाऊंटच्या आधारे बदनामी करत आहे.
अशीच एक घटना मागील महिन्यात पारनेर तालुक्यात घडली होती. यासंदर्भात सायबर पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता फिर्यादी महिलेच्या गावातीलच अल्पवयीन मुलाने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून महिलेच्या फोटोचा गैरवापर करत बदनामी केली होती.
अहमदनगर शहरात राहणार्या एका युवतीने फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी, 26 मार्च, 2022 रोजी ही घटना उघडकीस आली. फिर्यादीच्या फोटोचा वापर करून त्यांच्या नावे इंस्टाग्रामवर दोन बनावट अकाऊंट तयार करण्यात आले. त्या अकाऊंटवरून फिर्यादीची बदनामी करण्यात आली. 28 फेब्रुवारी, 2022 च्या पूर्वी ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिलेने शनिवार, 26 मार्च, 2022 रोजी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंंवि. कलम 500 सह आयटी अॅक्ट 66 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Defamation of a young woman by creating a fake account on Instagram