Home नाशिक तीन मैत्रिणी कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या पण धक्कादायक घटनेने परिसर हादरले

तीन मैत्रिणी कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या पण धक्कादायक घटनेने परिसर हादरले

कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघींचा बुडून मृत्यू (Death). नाशिक जिल्ह्यातील घटना.

Death Three people who went to wash clothes drowned

नाशिक | नांदगाव : कपडे धुण्यासाठी के. टी. बंधाऱ्यावर गेलेल्या दोघी मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना चिंचविहिर (ता. नांदगाव) येथे घडली. पूजा अशोक जाधव ( वय १६) व खुशी देवा भालेकर (वय १६) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. या घटनेने चिंचविहीर परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा जाधव व तिची मैत्रिण खुशी भालेकर व कावेरी भालेकर या तीन मैत्रिणी कपडे धुण्यासाठी चिंचविहीर तांड्याजवळील के. टी. बंधाऱ्यावर गेल्या होत्या. त्यातील पूजा व खुशी या दोघींचा चिखलात पाय रुतल्याने त्या पाण्यात पडल्या. त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी कावेरी भालेकर हीदेखील पाण्यात उतरली. मात्र, तीही पाण्यात बुडू लागली. मुलींचा आरडाओरड ऐकून ही घटना आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी पाण्यात उतरून तिघींना बेशुद्धावस्थेत अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले.

उपचारासाठी त्यांना तत्काळ नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील पूजा जाधव व खुशी भालेकर (रा. चिंचविहीर तांडा) या दोघींना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले, तर कावेरी भालेकर हीचा जीव वाचला. तिला पुढील उपचारार्थ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने चिचविहीर तांड्यासह परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकरुखे शिवारात बंधाऱ्यात बुडाली महिला

चांदवड:तालुक्यातील एकरुखे शिवारात धात पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथील विजय महानोर कुटुंबीय गत महिनाभरापासून शेळ्या चारण्यासाठी एकरुखे येथील दादा गांगुर्डे यांच्या शेतात वास्तव्यास आहे. त्यांच्यासोबत असलेल्या लक्ष्मीबाई विजय महानोर (वय २५) या जवळील धान्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलीस पाटील संपत जाधव यांनी वडनेरभैरव पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक तांगड यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. याबाबत वडनेरभैरव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Death Three people who went to wash clothes drowned

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here