संगमनेर घटना: महिलेचा तळ्यात पडून बुडून दुर्दैवी मृत्यू
Sangamner News: घटस्फोटीत महिलेचा मृतदेह तळ्यात तरंगताना (Drowned) आढळून आला.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात दुर्दैवी घटना समोर आली आहे. संगमनेर शहरात राहत असणारी मात्र कामानिमित्ताने कोकणगाव येथे जाणारी एक घटस्फोटीत महिलेचा कोकणगाव शिवारातील तळ्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कविता भिमराज दिघे (वय 40, रा. मालदाड रोड, संगमनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला ही कोकणगाव येथे मेडीकल दुकान चालवित होती. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती कोकणगाव येथे गेली. सोबत नेलेला जेवणाचा डबा दुकाना शेजारी ठेवत आपण निझर्णेश्वराला जावून येते असे सांगून गेली. ती परत आली नाही.
दरम्यान तिचा शोध घेतला असता कविताचा मृतदेह तळ्यातील पाण्यात तरंगतांना आढळून आला. याबाबत बाबासाहेब विश्वनाथ दिघे यांनी तालुका पोलीस ठाण्यास खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 106/2022 प्रमाणे नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बढे करत आहे.
Web Title: death of a woman after falling into a lake and drowned