Home अहमदनगर अहमदनगर: विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

अहमदनगर: विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: एका सहा वर्षीय चिमुकल्याचा घरासमोर खेळत असताना विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना.

Death of a toddler after falling into a well

श्रीगोंदा : तालुक्यातील देवदैठण येथील लोखंडे वस्ती येथील एका सहा वर्षीय चिमुकल्याचा घरासमोर खेळत असताना विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२१) घडली. आर्यन सुनील लोखंडे असे मृत मुलाचे नाव आहे.

आर्यन हा घरासमोर खेळत होता. त्यांच्या घरासमोरच एक विहीर आहे. तो खेळत असताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज आहे. बराचवेळ झाले तरी आर्यन दिसत नसल्याने त्याची आई अश्विनी लोखंडे यांनी वस्तीवरील सर्वांना सांगितले. त्यानंतर सर्वांनी परिसरामध्ये पाहणी केली. त्यामुळे कुटुंबातील काहींनी बेलवंडी येथील पोलिस ठाण्यात जाऊन तो बेपत्ता झाल्याची खबर दिली. घराशेजारी उसाचे क्षेत्र असल्यामुळे काहींना मुलाला बिबट्याने नेले की काय अशी शंका आली? तसेच घरासमोर विहिरी असल्यामुळे विहिरीत पडल्याचीही शंका घरच्यांना आली? त्यातच विहिरीजवळ बॉल पडल्याचेही दिसले. त्यामुळे विहिरीत पाहणी केली असता आर्यन विहिरीत पडल्याचे दिसून आले.

Web Title: Death of a toddler after falling into a well

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here