Home अहमदनगर अहमदनगर: बारावीचे पेपर देत असलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर….

अहमदनगर: बारावीचे पेपर देत असलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर….

Ahmednagar News: बारावीचे पेपर देत असलेल्या मुलीचा फूड पाॅइझनमुळे मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना.

Death of a student while giving her 12th paper

राहता:  बारावीचे पेपर देत असलेल्या मुलीचा फूड पाॅइझनमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली आहे. तेजस्विनी मनोज दिघे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस्विनी आणि तीचे आजोबानी बुधवारी सकाळी रात्रीचे शिळे इडली-सांबर खाल्ले. त्यानंतर तेजस्विनीला पोटाचा त्रास सुरु झाला. तिला उपचारासाठी लोणी येथील पीएमटी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले, परंतू निदान होत नसल्यामुळे पुन्हा पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान समोवारी तिचा मृत्यू झाला. आजोबा बिमराज दिघे यांनाही फूड पाॅइझनचा त्रास झाला. परंतू त्यांची तब्येत बरी झाल्याने त्यांना दोन दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, ज्या दिवशी तेजस्विनीला फुड पाॅइझनचा त्रास झाला त्यादिवशी तिचा रसायनशास्त्राचा पेपर होता. तेजस्विनी बाभळेश्वर येथील कॉलेजमध्ये शिकत होती. एम.जी. कॉलेज  प्रवरानगर केंद्रावरती तिचे बारावीचे बोर्डाचे पेपर चालू होते. प्रथम इंग्रजी, दुसरा भौतिकशास्त्राचा पेपर तिने दिला होता. तेजस्विनी ही सायन्स शाखेत वर्गात हुशार होती. पुढे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Death of a student while giving her 12th paper

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here