Home बीड वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू, गारपीट आणि विजेचा कडकडाट यामुळे होत्याचं नव्हतं...

वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू, गारपीट आणि विजेचा कडकडाट यामुळे होत्याचं नव्हतं झालं

Beed News: वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट आणि विजेचा कडकडाट यामुळे शेतात होत्याचं नव्हतं, वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू. (Death of a farmer due to lightning)

Death of a farmer due to lightning, hailstorm

बीड:  बीड जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट आणि विजेचा कडकडाट यामुळे शेतात होत्याचं नव्हतं झालं. नद्या देखील दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर अन्य 2 शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

महादेव किसन गर्जे वय 60 राहणार सुर्डी असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेळ्या चरण्यासाठी गेले असता अचानक वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस वाढल्याने ते एका झाडाखाली थांबले. मात्र याचवेळी झाडावर वीज कोसळून त्यांचा जागीच मुत्यू झाला. तर यावेळी त्यांच्या दोन शेळ्या देखील दगावल्या आहेत.

त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध भागात 12 ते 15 जनावरे दगावली आहेत. मोठमोठ्या गारांनी कांदा चाळीवर असलेल्या पत्र्याची चाळण झाली. अनेक ठिकाणी गारपीटीमुळे बर्फाची चादर बीड जिल्ह्यात पाहायला मिळाली. शेतातील गहू, ज्वारी, आंबा, मोसंबी, पपई, टरबूज, भाजीपाला यासह विविध पिकं भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी चिंतातूर झाला आहे.

दुसरी घटना बीड तालुक्यातील तिप्पटवाडी येथे घडली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात वीज पडून दोन बैल दगावले आहेत. यामुळे शेतकरी आनंता नामदेव शेडगे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तिसरी घटना केज तालुक्यातील देवगाव व मांगवडगाव येथे घडली. देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे यांचा बैल तर मांगवडगाव येथे वीज पडून दत्तू मुळूक यांची गाय दगावली आहे. 

चौथी घटना केज तालुक्यातील रामेश्वरवाडी शिवारात घडली. शेतामध्ये असलेले जयराम तुकाराम हंगे यांचा 1 बैल व 1 गाय तसेच शशिकांत संपतराव हंगे यांचा 1 बैल वीज पडून दगावले आहेत. यासह जिल्ह्यातील अनेक भागात अशा घटना घडल्या आहेत.

केज तालुक्यातील मांगवडगाव येथील सरु बाई गुणवंत गायकवाड आणि सुकुमार रामधन गायकवाड या एकाच घरातील शेतकऱ्यांचे, सोलारचे दोन सेट वादळी वाऱ्याने पूर्णपणे उखडून गेले आहेत. काही सोलार प्लेट्स या विहिरीमध्ये जाऊन पडल्या. शेतकरी गायकवाड कुटुंब त्या सोलारवर दहा एकर जमीन भिजवत होते. 2019 ला हे सोलार बसवलेले होते आणि तेव्हापासून त्यांचं शेतीचे उत्पन्न वाढलं होतं. मात्र एका दिवसामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि या शेतकरी कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे.

तर बीड तालुक्यातील पोखरी घाट येथे झालेल्या, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात गारपिटीने शेतकरी संदिपान अंबादास झांजुर्णे यांच्या शेतातील कांदा चाळीचे सिमेंट पत्र्यांची चाळण झाली आहे. यामुळे त्यांचे अंदाजे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. कांदा चाळीचे सिमेंट पत्रे हे गारांनी फाटले आहेत. तसेच प्लास्टिक पाण्याच्या टाक्या फुटल्या आहेत. तसेच आंब्याच्या झाडांचे प्रचंड नुकसान झाले असून एकही कैरी झाडाला राहीली नाही, कैऱ्यांचा सडा पडला आहे. अवकाळी अन गारपिटीने हाहाकार केल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ आधार देण्याची गरज आहे.

Web Title: Death of a farmer due to lightning, hailstorm

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here